castus
Active Member
In our society, it is not that easy for a woman, living with her family, to attempt a solo trip. Especially when the itinerary included some very remote villages in the Kashmir valley. Something no regular tourist will ever imagine doing. This is a chronicle of one unplanned and barefoot trip to border regions between India and Pakistan. ...All Alone English Part 1 on Page 6
आपल्या समाजात संसारी स्त्री ने एकटीने (solo) प्रवासाला निघायचे हे वाटते तितके सोपे नाही. त्यातही तो प्रवास सर्वसाधारण पर्यटक जायचा विचारही करत नाहीत अशा काश्मीर खोर्यातील दुर्गम प्रदेशाचा! हिंदुस्तान- पाकिस्तान च्या बोर्डर (LOC) वर वसलेल्या प्रदेशातल्या माझ्या अनियोजित (unplanned) आणि अनवाणी (barefeet) भटकंतीची हे चित्रण !
एकटीने Marathi Part 1
ज्या क्षणी एकटीने प्रवासाला निघायचं हा विचार मनात येतो खरंतर त्याक्षणीच प्रवास सुरु झालेला असतो. कारण प्रत्यक्षात निघण्यापूर्वी घरच्यांच्या विरोधापासून ते सामाजिक उपेक्षेपर्यंत असा एक मोठा पल्ला तिला रीतसर पार पाडायचा असतो. प्रवासाच्या आधीचा हा प्रवास म्हणजे स्त्रीच्या अटळ निश्चयाची परीक्षा आणि आगामी आव्हानांची पूर्वतयारी असते.
स्त्री मुक्ती चळवळीचा सर्वसामान्य शहरी माणसाला जवळजवळ विसर पडला आहे. सर्वच क्षेत्रांत, सर्व पदांवर स्त्री ने जी आगेकूच केली आहे आणि त्याबद्दल सर्व स्तरांवर तिचा गौरवही झाला आहे, हे वास्तव पहाता तो विसरही स्वाभाविक वाटतो. स्त्रीजातीला भोगायला लागलेले भोग सध्या कालातीत झाले आहेत असा द्दृढ समज रूढ आहे आणि प्रेक्षकांनी गौरवलेल्या स्त्रीप्रधान सिनेमांपासून ते भोळसट नवरे आणि त्यांच्या चतुर बायका या विषयावर सोशल मिडिया वरच्या विनोदांना मिळणारी दाद पाहिली की चित्र पूर्ण पालटले की काय असाही विचार मनात येतो.
वरकरणी संपलासा वाटणारा हा विषय मुळासकट मात्र अजून उपटून फेकला गेलेला नाही. आजही लग्नानंतर एका आडनावाचे विलीनीकरण करण्याची वेळ येते, मुलांचे संगोपन करण्यासाठी दोघांपैकी कोणी एकाने नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ येते किंवा परस्पर सामंजस्याने (?) कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्याची वेळ येते तेव्हा आपल्या समाजात सहसा स्त्रीच पुरुषापेक्षा दोन पाउले पुढे असते. स्त्रीची अंगभूत क्षमता वादातीत आहेच. तिने ती वेळोवेळी सिद्ध करूनही दाखवली आहे पण गरजेखातर त्या क्षमतेचेच सहजी संयमनही करता येणे हा ही तिच्या मूलभूत शक्तीचा अविष्कार नाही का? माझ्या अंगभूत गुणांची मला पुरेपूर जाणीव होती, त्यांची सिद्धी आणि संयमन हे निसर्गत:च मला अवगत आहे हा विश्वास होता, हेच माझ्या प्रवासाच्या यशाचे गमक आहे.
आधीच म्हटल्याप्रमाणे प्रवास सुरु झाला, तिथेच विरोधही सुरु झाला किंवा विरोध सुरु झाला, प्रवास तिथूनच सुरु झाला.
खरेतर साग्रसंगीत विरोध व्यक्त करण्यामध्ये एखाद्या स्त्रीचा हात धरू शकणारा पुरुष अजून जन्माला यायचाय. आदळआपट करण्यापासून, आर्जवे करण्यापर्यंत आणि असह्कारापासून अबोल्यापर्यंत अशा विरोध दर्शवण्याच्या अनेकतम तंत्रांवर स्त्रीचे 'वादातीत' प्रभुत्व असते, पुरुषांनी गरजेपोटी त्यातलेच एखाद-दुसरे तंत्र मेहेनतीने आत्मसात केले तरीही सहसा बायकोच्या पक्क्या इराद्यापुढे नवरयाचा उसना विरोध कुचकामी ठरतो सहसा असेच चित्र दिसते!
आमची परिस्थिती याहून वेगळी होती. इथे त्याचा विरोध आणि माझा इरादा दोन्ही डळमळीत होते, ते कसे त्याचे विवचन करते.
राजच्या मवाळ स्वभावानुसार त्याचा विरोध बोथट असणार हे खरे पण त्याहीपेक्षा त्याच्या मनाची जी अव्यक्त घालमेल होत होती धार त्याला होती. राजला माझी काळजी होती आणि त्याचाच त्याला त्रासही होत होता. साहसाची आवड त्यालाही आहे पण माझे साहस अव्याहत चालूच असते त्यामुळे तारतम्य ही त्याची सवय बनली आहे. आमच्या सहजीवनात मी जेव्हा जेव्हा परिणामांचा विशेष विचार न करताउडी घेतली, त्या प्रत्येक वेळी न जाणो माझा अंदाज चुकला तर म्हणून जिथे मी आदळायची शक्यता होती तिचेच मला सांभाळण्यासाठी तो जमिनीवर खम्बीर पाय रोवून उभा रहात आला. त्याबद्दल त्याने कधीही खेद व्यक्त केला नाही पण वेळोवेळी मला बजावले की "अज्ञानात सुख असते वगैरे ते तुझ्यापुरते, कारण तुझे अज्ञान हे माझी जबाबदारी वाढवते".
मागे एक सुंदर गोष्ट वाचण्यात आली होती. एकदा एक स्त्री एका उंच आणि धोकादायक पुलाच्या टोकाला उभी होती. ज्याने सुख दु:खात साथ देण्याची वचने दिली तो तिचा जीवनसाथी पुलाच्या दुसऱ्या टोकाशी तिचीच वाट पहात थांबला असेल अशी अपेक्षा होती. त्याला स्त्री ने कितीदा आवाज दिला असेल, पण त्याच्याकडून प्रतिसाद शून्य! आर्तेतेने तिने हाका मारणे चालूच ठेवले तेव्हा कुठे एकदा त्याचा प्रतिसाद आला, "तुला हवे तेव्हा हवे तिथे मी उपस्थित राहू शकेन या भ्रमात राहो नकोस. मी कामात आहे. नाही येऊ शकत मी. तुझा तू प्रयत्न कर." त्याने तिचे मन मोडले. ती दुखावली, पण जेव्हा सावरली तेव्हा अपमानची धग दडपून, आत्मविश्वास आणि हिम्मत यांच्या जोरावर सारे मनोबल एकवटून त्या उंचच उंच धोकादायक पुलावर तिने पाउल टाकले. हळू-हळू एकेक पाउल टाकत, कशीबशी पार करते तो पूल तर पलीकडे आपल्या पतीला बघून तिच्या अश्रूंचे पाट भरभरून वाहू लागले कारण तीने पूल सुरक्षित पार करेपर्यंत पुलाची मोडलेली बाजू त्याने आपल्या खांद्यावर सावरून धरली होती.
प्रत्येक धोक्याच्या वळणावर राज असा माझा साथी-सारथी असतो.
तळव्याला चटका लागल्यावर पाय पाठी घेणे ही प्रतिक्षिप्त क्रिया झाली. जेव्हा तशीच गरज पडते तेव्हा (सं)वेदनेला तात्काळ प्रतिक्रिया देऊन चेतातंतू त्यांचे काम चोख बजावतात. पण एखादे संकट तळव्याला चटका लागण्याइतपतच असेल ह्याची काय हमी? शिवाय समोरचा रस्ता तसाच खडतर दिसतो तेव्हा काम मज्जातंतूंचे की चेतातंतूंचे! अनोळखी आणि दुर्दम्य अशा प्रदेशात एकट्या स्त्री ने जायचे ही कल्पना सर्वसाधारणपणे मनात भीतीची घंटा वाजवणारी आहेच. त्यातून वैयक्तिक सुरक्षेची तडजोड करावी लागण्याची वेळही येऊ शकेल इतपत तो प्रदेश कुप्रसिध्द असला तर छातीची धडधड काय नि भीतीची घंटा काय दोघांची गती वाढणारच.
तसे पहाता भीती ही आगामी धोक्याची जाणीव करून करून देण्यासाठी निसर्गाने केलेली चोख व्यवस्था आहे. याउप्परही मला कसलीच भीती वाटत नाही याचीच भीती त्याला सर्वात जास्त वाटत असते. यावरून आमचे वेळोवेळी खटके ही उडतात पण यंदा माझा एकूणच उत्साह आणि आविर्भाव पहाता तो निमूट गप्प होता हे मात्र खरे! त्याचा विरोध आणि नापसंती चाचपडून बघण्यासाठी अधेमध्ये मी माझ्या प्रवासाचा विषय उकरून काढायची. मीच त्यावर काहीबाही बोलायची. बाकी कोणीही त्यावर एक चकार शब्द काढायचे नाही. मुलींना त्यात फारसा रस नसावा आणि राजला त्याबद्दल साफ आक्षेप आहे हेच जाहीर करायचे असायचे. आपल्याच लोकांच्या निर्विकार प्रतिक्रियेमुळे माझे मन मलूल होत असे.
याच पार्श्वभूमीवर दर रात्री मिटल्या डोळ्यांआड ज्या स्वप्नाना उलगडून मी बागडायची तीच सारी स्वप्ने सकाळी जग येताच मी घडी घालून आवरून ठेवायची. आपला आनंद हा आपल्या जवळच्या व्यक्तीचा आनंद नसेल तर आपण किती सहजपणे त्याची आहुती देऊन टाकत असतो.
पण एक दिवस अचानक कौल माझ्या बाजुने पडला. कौल देणारीही एक स्त्रीच! नात्याने ती माझी सासू लागते पण ती अखंड शक्तीचे स्रोत बनून माझ्या आयुष्यात आली आहे. मला कुठून सुबुद्धी झाली की मी तिच्या उपस्थितीत हा विषय काढला. अथांग सागरात भरकटत पुढे जाणारया समुद्रातील लाटेला उगीचच वाटत रहाते की मला कुशीत घेणारे असे या जगात कुणीच नाही. किनारयाने आलिंगन दिले की मात्र तिच्या मनातील काहूर शांत होऊन तिथेच ती विसावते. माझ्या सासूची प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्या मनात विचारांचे जे तरंग उठत होते त्यांचेही काहीसे तसेच झाले.
“सुप्रिया एकटीच आहे असे आपण का म्हणायचे? जिथे ती जाईल तिथे तिथली माणसे असतीलच की. आपली माणसे नसली तर वेळप्रसंगी अनोळखी माणसेही मदतीला उभी रहातात. जाऊ दे तिला, अशा प्रवासातून जे शिकायला मिळते ते एरव्ही कुठे शिकायला मिळत नाही. ते सारे शिकून ती सुखरूप परत येईल.”, तिने हे शब्द उच्चारलेले काय आणि आकस्मातच ओहोटी सरून फिरून भरती यावी तसे दुरावत गेलेले माझे मनोबल माझ्या स्वप्नांच्या मोठमोठ्या लाटा होऊन माझ्या नसानसात संचारले.
यापूर्वीही आयुष्यातले मोठमोठे निर्णय घेताना जेव्हा सारे जग विरोधात होते तेव्हाही हीच माझी सासू माझ्या बाजूने खंबीर उभी राहिली आहे.शाळेतील हुशार मुली म्हणून कीर्ती असतानाहीमालविका, राधा या आमच्या दोन मुलींनी बारा वर्षाच्या कोवळ्या वयात, माझ्या जगावेगळ्या तर्कशास्त्रानुसार शाळा सोडायचे ठरले (unschooling). माझा प्रयोग यशस्वी होईल की नाही याचे तेव्हामाझ्याकडे काहीही प्रमाण नव्हते तरीही त्याबद्दल तिला किंचित चिंताही वाटली नाही. “सुप्रिया नेमके काय करते आहे याचे ज्ञान आपल्याला नाही हेच फक्त आपल्या भीतीचे कारण आहे. आपल्या अज्ञानामुळे आपण तिच्यावर अविश्वास दाखवायचा हे मात्र बरोबर नाही.”, सोप्या शब्दात तिने केवढा मोठा युक्तिवाद मांडला. तिने माझ्यावर एवढा विश्वास प्रगट केल्यावर काय बिशाद होती की मला इतर कुणाच्याही विरोधाची पर्वा वाटेल?
तसेच या वेळी सुद्धा कुटुंब प्रमुखानेच हिरवा झेंडा फडकवल्यावर लागलीच मी मुंबई ते श्रीनगर तिकीट काढूनच टाकले. आता मात्र कुठच्याही अडचणीला तोंड द्यावे लागले तरी माझा इरादा पक्का होता.
एकटीने Marathi Part 2 on Page 3

Last edited: